भाजप म्हणजे ‘जेल गाडी’ आणि ‘लिंच पुजारी’- कॉंग्रेस

narendra modi sad

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयपूरमधील रॅलीत काँग्रेसची ‘बेल गाडी’ अशी केल्यानंतर काँग्रेसनेही भाजपवर शरसंधान केलं  आहे. भाजप म्हणजे ‘जेल गाडी’ आणि ‘लिंच पुजारी’ असल्याची खोचक टीका.काँग्रेसचे नेते शकील अहमद यांनी ट्विटरवरून केली आहे.

‘काँग्रेसचे काही नेते जामिनावर बाहेर आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला ‘बेल गाडी’ असं म्हटलं. असं असेल तर भाजपला ‘जेल गाडी’च म्हटलं पाहिजे. भाजपचे दोन अध्यक्ष कोर्टाच्या आदेशानंतर तुरुंगात गेले होते. मात्र ‘जेल’ जाण्यापेक्षा ‘बेल’वर बाहेर राहणं कधीही चांगलंच,’ अशी टीका अहमद यांनी केली आहे.

त्याचबरोबर काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही भाजपवर यावेळी टीका केली. ‘लिंचिंग प्रकरणात (जमावाकडून घडलेली हत्या) जामिनावर बाहेर आलेल्या ८ आरोपींचा केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी सत्कार केला. मोदीजी तुम्ही चुकीचा अर्थ काढला. जनता सरकारला ‘लिंच पुजारी’ म्हणत आहे,’ असा टोला मोदीना सिब्बल यांनी लगावला आहे.

‘वाणी’ स्वातंत्र्याची गळचेपी करणारं पद नको; भाजपा खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देणार ?

केवळ माझा द्वेष करण्यासाठीच विरोधक एकत्र आले – नरेंद्र मोदी

नागराज मंजुळे आठवलेंच्या जीवनावर चित्रपट बनवणार

Loading...

1 Comment

Click here to post a comment