नांदेड: ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे. यावर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यावरच आता खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी प्रतिक्रिया देत भाजपकडून सुडाचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“भारतीय जनता पार्टी सुडाचे राजकारण करत असून कुठेतरी शासकीय यंत्रणेचा राजकीय सूडापोटी भाजप वापर करत आहे, हे कितपत योग्य आहे? व मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे हे अत्यंत चुकीचे आहे. शासकीय यंत्रणेचा वापर करून कुठेतरी दडपशाही करण्याचा प्रकार केंद्र सरकार मधील यंत्रणा करत आहे.”, असा आरोप अनिल देसाई यांनी केला आहे. ते नरसी तालुका नायगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.
सध्या राज्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरु असून शिवसेनेचे सर्व खासदार विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अनिल देसाई सध्या नांदेड दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान या कारवाईनंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सावधान; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला रेड अलर्ट!
- “महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राबद्दल द्वेष सरळ दिसून येतोय”, निलेश राणेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला
- ‘मी त्यानंतर ७ ते ८ तास त्रासात होतो’ शुबमन गिलचा WTC सामन्यासंबंधी मोठा खुलासा
- उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; मनोहर जोशींचा हवाला देत नितेश राणे म्हणाले…
- IPL 2022: आयपीएल आधी शास्त्री मास्तर संतापले ; बीसीसीआयच्या घटनेला मूर्ख म्हणत फटकारले