fbpx

भाजपचे नेतृत्व एक हत्येचा आरोपी करतोय – राहुल गांधी

बंगरुळु – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. दरम्यान आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे नेतृत्व एक हत्येचा आरोपी करत असल्याची टीका अमित शहा यांच्यावर केली. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले की, भाजपा पक्ष नेहमी प्रामाणिकपणा आणि सभ्यतेबद्दल बोलत असतो, मात्र एक अशी व्यक्ती त्यांचा प्रमुख आहे ज्याच्यावर हत्येचा आरोप आहे असं राहुल गांधी बोलले आहेत. अमित शाह यांनी विश्वासार्हता गमावली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

“अमित शाह हत्येचे आरोपी होते. त्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्यांचा भूतकाळ पाहिला पाहिजे. कोणत्या गोष्टींसाठी ते जबाबदार आहे ते देखील पाहिलं पाहिजे. ते कशाप्रकारे राजकारण करतात ते पहा. याशिवाय ते हत्येचे आरोपी आहेत हे विसरु नका. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भाजपाचा अध्यक्ष हत्येचा आरोपी आहे. हे सत्य आहे’.अशी टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली.