भाजपा ही दहशतवादी संघटना! ममता बॅनर्जी यांची कणखर टीका

mamata banarji

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी भाजप हि दहशतवादी संघटना असल्याची टीका केली. त्या गुरुवारी कोलकत्ता येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

ममता बॅनर्जी गेल्या काही महिन्यांपासूनभाजपाविरोधी आघाडी उभारण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी म्हटले की, आमची संघटना म्हणजे भाजपासारखी दहशतवादी संघटना नाही. भाजप हे ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदूंमध्ये भांडणं लावून देतात आणि राजकारण करतात.

ममता बॅनर्जी यांनी केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून त्यांच्या ध्येय धोरणांना लक्ष्य केले आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपने ग्रामिण भागात पक्ष वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे ममतांनीही आपला पक्ष मजबूत करण्याकरिता आपल्या राजकीय रणनीतीत बदल केले आहेत. मागील काही धोरणात ममतांनी घेतलेले निर्णय कसे हिंदूंच्या विरोधातले आहेत, असा प्रचार भाजपने चालवला होता. हिंदू विरोधी प्रतिमा बनवण्याचे काम भाजपने हाती घेतले होते. हि प्रतिमा बदलण्यासाठी ममता प्रयत्न करीत आहे.

Loading...