‘भाजपा विकृत मानसिकतेचा पक्ष…भाजपाचा महाराष्ट्र द्रोह विसरू नका!’

bjp vs congress

मुंबई : कोरोना लसच नाही तर वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला असल्याचा आरोप काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या मध्ये एन-९५ मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स यांचा समावेश आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांना रुग्णसंख्येपेक्षा जास्त पटीने हे सर्व साहित्य पुरवण्यात आले असल्याचे देखील चव्हाण यांनी म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या आरोपानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘भाजपा सारख्या विकृत मानसिकतेच्या पक्षालाच अशा मानवतेसाठी भीषण संकटात राजकारण सुचू शकते. सत्तेचा हव्यास मानसिक विकृतीत कसा बदलू शकतो हे भाजपा नेत्यांच्या रुपाने दिसत आहे. महाराष्ट्रावर जाणिवपूर्वक अन्याय होत असताना हा भाजपाचा महाराष्ट्र द्रोह विसरू नका!’ असा घणाघात सचिन सावंत यांनी केला आहे.

पृथीवराज चव्हाण यांचे गंभीर आरोप –

चव्हाण यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गुजरातला सर्वाधिक मास्क, पीपीई किट आणि व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. या दोन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यानंतर निवडणुका सुरू असलेल्या पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. तर चौथ्या क्रमांकावर तामिळनाडू आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रानंतर केरळ राज्याचा क्रमांक लागत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.

चव्हाण यांनी केलेल्या आरोपानुसार १००० रुग्णांमागे गुजरातला १३ व्हेंटिलेटर देण्यात आले आहे तर महाराष्ट्राला केवळ दोन व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. यात उत्तर प्रदेशला एक हजार रुग्णांमागे सात व्हेंटिलेटर देण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या असतांना केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP