‘भाजपने जि.प. पोटनिवडणुका पैशाच्या जोरावर जिंकल्या’; अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार

धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या झालेल्या पोटनिवडणुका भाजपनं पैशाच्या जोरावर जिंकल्या आहेत. भाजपला रसद कोण पुरवत आहे हे राज्य सरकारच्या माध्यमातून बघणे आवश्यक आहे, असे महसूल मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. ते धुळ्यातील विजयी उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.

धुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आघाडीच्या उमेदवारांचा अब्दुल सत्तार यांनी सत्कार केला. यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले, हा पक्ष फक्त राजकारण करतो. प्रत्येक चांगल्या कामाला, जनतेच्या हिताच्या विषयाला विरोध करतो. त्यामुळे तो सतत जनतेत बुद्धीभेद करत असल्याचे राजकीय वाटचालीतून दिसून आले आहे.

कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना भाषणादरम्यान स्टेजवर एक कुत्र्याचे पिल्लू आले होते. सत्तार यांनी त्याकडे बघत हे आपल्या पक्षाचं नाही, आपण काय बोलतोय हे ऐकण्यासाठी त्याला पाठवले असेल, असा टोला लगावला, त्यावर कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.

पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, केंद्र सरकारमधील काही माल आलेले लोक खाली आहे आहेत आणि ते गावा गावात फिरु लागले आहे. आपण यांची चौकशी लावली पाहिजे. भाजपचे जर सरकार केंद्रात असेल तर आपलेही राज्यात आहे. त्यामुळे भाजपची जिरवायची असेल तर राज्य सरकारने यांची चौकशी लावली पाहिजे असेही सत्तार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या