भाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपची सत्ता असताना तत्कालीन सभापती राधाकिसन पठाडे यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची तक्रार थेट कृषी पणन संचालकांकडे करण्यात आली. ८८.८३ कोटींच्या या विविध कामांमध्ये संचालक मंडळांनी नियमबाह्य कामे देऊन गैरव्यवहारचा ठपका तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

याची दखल घेत तीन अधिकाऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणी सुरुवातीला सर्व संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्यात. आता या संचालकांचे लेखी म्हणणे घेतले जात आहे. तसेच विकासकामांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च, प्लॉट, किराणा मार्केट गाळे वाटप आदी गैरव्यवहाराच्या झाडाझडतीला सुरुवात झाली आहे.

पूर्वी बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता होती, पण भाजप नेते हरिभाऊ बागडे यांनी राधाकिसन पठाडे यांना भाजपच्या गोटात आणून सभापती पद दिले. त्यानंतर भाजी मंडई ते जळगाव पर्यायी रोड, नवीन इमारत, महागडे फर्निचर, फूल मार्केटसह विविध कामे केली.

हे आहेत आरोप
1) बाजार आवारातील चेक पोस्ट नाक्यापासून ते फूल मार्केटपर्यंत रस्त्याच्या कामांची आवश्यकता नव्हती. मूळ अंदाजपत्रकापेक्षा ४.७८ टक्के जास्त दराने कामाची निविदा मंजूर केली.

2) रिंग पद्धतीने मर्जीतील ठेकेदारांना काम दिले. फेरनिविदाही घेतली नाही.

3) फेज एकमध्ये जुना मोंढा स्थलांतरित करण्यासाठी रस्ते, लाइट, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कामांची निविदा काढली.

महत्वाच्या बातम्या