भाजप पुढच्या निवडणुकांनंतर विरोधी पक्षात; धनंजय मुंडेंचे भाजपला टोले

dhananjay munde

दौंड: धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. “भाजपकडे प्रचंड बहुमत आहे. संसद चालवणे हे सत्ताधारी पक्षाच्या हातात असते. भाजपला माहिती आहे की ते पुढच्या निवडणुकांनंतर विरोधी पक्षात असणार. त्यामुळे आतापासूनच आंदोलनांची सवय लावून घेत आहेत” असा टोला धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला.

Loading...

धनंजय मुंडे म्हणाले, विरोधी पक्षाचे खासदार संसदेचे कामकाज चालू देत नाही म्हणून देशाचे पंतप्रधान व भाजपचे खासदार आपआपल्या मतदारसंघात उपोषणाला बसले आहेत. मी पंतप्रधानांना प्रश्न विचारू इच्छितो की भाजप विरोधी पक्षात असताना तीन महिने अधिवेशन चालले नव्हते तेव्हा गप्प का होता? असा प्रश्न त्यांनी निर्माण केला. तसेच संसदेचे कामकाज चालत नाही म्हणून जर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपोषणाला बसत असतील तर ही गंभीर गोष्ट आहे. बहुमत असताना पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उपोषणाला बसावे लागत असेल तर आजची तारीख इतिहासात नोंदली जाईल. असेही मुंडे म्हणाले.Loading…


Loading…

Loading...