गोटे यांच्या बंडानंतरही धुळ्यात भाजपचं

टीम महाराष्ट्र देशा –  आमदार गोटे यांनी ऐन निवडणुकीच्या काळात भाजपा सोडून नवीन पक्ष स्थापन केल्याने धुळे पालिकेच्या रंगत आली होती. आमदार गोटे यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी स्थापन केलेल्या लोकसंग्राम पक्षाच्या किती जागा येणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले.

निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता काबीज केली आहे. एकूण ७४ जागेच्या महापालिकेमध्ये भाजपने तब्बल ४९ जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे. बहुमतासाठी ३८ जागाची आवश्यकता होती.

फायनल निकाल

भाजपा – ४९

शिवसेना – २

आघाडी – १४

सपा – २

लोकसंग्राम – १

इतर – ६

एकूण जागा – ७४

अहमदनगर : आघाडीला सत्ता स्थापनेपासून रोखायचं असल्यास युती करावीच लागणारLoading…
Loading...