भाजपचा पलटवार : अजित पवार आणि शरद पवारांना ‘या’ व्हीडीओबद्दल विचारा

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील पण आम्ही नाही अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या भाजपच्या आंदोलनादरम्यान शिवसेनेवर केली होती. आता यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर सणसणीत उत्तर दिलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

बांगड्या हे महिलांचे आभूषण आहे. पौराणिक कथेमध्ये महिषासुर नावाच्या असुराचा वध बांगड्या घातलेल्या देवीने केला होता. हे फडणवीस विसरले असतील. मात्र नकारात्मक विचार असणाऱ्या असुराचा वध करायला महाराष्ट्रातील रणरागिणी मागे हटणार नाही, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.

Loading...

आदित्य ठाकरेंच फडणवीसांना उत्तर –

फडणवीस याच्या वक्तव्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन माफी मागण्याची विनंती केली होती. “देवेंद्र फडणवीसजी, सहसा मी प्रत्युत्तर देत नाही. कृपया बांगड्यांबाबतच्या विधानाबाबत माफी मागा. सर्वात शक्तिशाली असा महिलावर्ग बांगड्या परिधान करतो. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागतात की नाही?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अमृता फडणवीस यांची प्रकरणात ऊडी –

या वादात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील उडी घेतली आहे. रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ समजणार नाही, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं. ‘रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो’, अशा आशयाचं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्वीटला कोट करत दिलं आहे. यामध्ये आदित्य ठाकरे, पती देवेंद्र फडणवीस आणि भाजपला त्यांनी मेन्शन केलं आहे.

भाजपचा चाकणकर – सुळेंवर पलटवार –

आता भाजपने यामुद्द्यावरून राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. महाराष्ट्र भाजपने यासंबंधी एक ट्विट केला आहे. यात त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भाषणातील व्हीडीओ किल्प टाकल्या आहेत ज्यात त्यांनी ‘बांगड्या भरल्या’ बद्दल वक्तव्य केल आहे.

तसेच चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंना अजित पवार आणि शरद पवारांना या व्हीडीओ बद्दल विचारा असं सांगाव असा टोलाही लगावला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं