लखनऊ : देशातील गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी तब्बल ६९० जागांसाठी मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निवडणूक आयोगाने आता प्रचार सभांसह गर्दी जमवण्यास बंदी घातली आहे. भाजपने बंदी लागू होण्यापूर्वीच ३९९ सभा घेतल्या तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २५० दौरे केले आहेत.
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता युपी निवडणुकीसाठी भाजपने दिल्लीत आज महामंथन बैठकीचे आयोजन केले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष उत्तर प्रदेश निवडणुकीकडे लागले आहे. पंतप्रधान मोदींनी लोकार्पण, भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त उत्तर प्रदेशमधील १२ हून अधिक जिल्ह्यांचा दौरा केला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचारसभा, सर्व प्रकारच्या रॅली यांवर बंदी घातली आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी १९ डिसेंबरपासून सुरू झालेल्या जनविश्वास यात्रेच्या निमित्ताने घेतलेल्या जनसभा, प्रचारसभा, रॅली, रोड शो, नुक्कड सभा यांची संख्या ३९९ च्या वर गेली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी २० ऑक्टोबर २०२१ रोजी कुशीनगर येथे एका आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमासह दौऱ्यांना सुरुवात केली. यानंतर सुल्तानपूर, प्रयागराज, वाराणसी, गोरखपूर, महोबा, झांसी, बलरामपूर, शाहजहांपूर, नोएडा, कानपूर आणि लखनऊ या ठिकाणी दौरे केले आहेत.
पंतप्रधान मोदींनी शेवटची प्रचारसभा २ जानेवारी रोजी मेरठला घेतली. तर भाजपने ९ जानेवारी रोजी आपल्या जनविश्वास यात्रेची सांगता केली. मात्र, कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पक्षाने काही रॅली, सभा रद्द केल्या आहेत. इतकेच नाही तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीही गेल्या दोन महिन्यांपासून उत्तर प्रदेशमध्ये जनसभा घेतल्या. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलिसांची तत्परता! ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचवले; पाहा व्हिडिओ
- महेश शिंदेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर;म्हणाले…
- “महापौर मॅडम तुमचं सरकार… तुमचा पेपर नेहमीच फुटलेला असतो”, सदाभाऊंची घणाघाती टीका
- हृतिक पुन्हा लग्न करणार? सुझानला घटस्फोट दिल्यानंतर वडील राकेश रोशन यांचा खुलासा
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची आज उच्चस्तरीय बैठक; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांच्या मंत्र्यांची राहणार उपस्थिती
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<