वाजपेयी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात

टीम महाराष्ट्र देशा – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी दीर्घ आजाराने दिल्लीत निधन झाले. त्यांच्यावर आज शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या निवसास्थानी ठेवल्यानंतर सकाळी अकरा वाजता भाजपच्या मुख्यालयात ठेवण्यात आले आहे.

वाजपेयी यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. कवी, साहित्यिक, पत्रकार, राजकारणी असे व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू असलेल्या वाजपेयींच्या निधनानं संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरात सात दिवसांचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे.

देशाने आज एक महापुरुष गमावला – अण्णा हजारे