fbpx

मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकार धोक्यात , भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी

टीम महाराष्ट्र देशा : १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान पार पडले आहे. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान असे असतानाच मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकार धोक्यात आले असल्याचं दिसत आहे. कारण भाजप नेते गोपाल भार्गव यांनी राज्यपालांना चिठ्ठी लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

गोपाल भार्गव चिठ्ठीमध्ये असे लिहिले आहे की, कमलनाथ सरकारमधील अनेक कॉंग्रेस नेते वैतागले आहेत. त्यांची कॉंग्रेस बरोबर काम करण्याची बिलकुल इच्छा नाही. त्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. तसेच भाजपकडून आमदार फोडण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. परंतु काँग्रेसच्या त्या आमदारांना कमलनाथ सरकारबरोबर काम करायचं नाही. हे सरकार आपल्या कर्मानं जाणार आहे आणि केंद्र आणि राज्यात भाजपाला जबरदस्त जनाधार मिळालेला आहे.त्यामुळे राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवावं, असे भार्गव यांनी म्हंटल आहे.

दरम्यान रविवारी शेवटच्या टप्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झीट पोल जाहीर झाले. या एक्झीट पोलनुसार मध्यप्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे सरकार असलेल्या राज्यात भाजपला बहुमत जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.तर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विट करत 2004 मध्ये एक्झिट पोल दाखविले होते. 2018 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निकालांचे एक्झिट पोल दाखविले होते. त्यात काँग्रेसचा पराभव होईल सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात निकाल उलट लागले होते. त्यामुळे 23 मे पर्यंत वाट पाहावी असा सल्ला त्यांनी दिला आहे.