निवडणुकांना पाच दिवस राहिले असताना भाजपने केले या ‘ मंत्र्यांचे निलंबन

BJP

टीम महाराष्ट्र देशा : सध्याच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत अनेक नेत्यांनी भाजपा शिवसेनेत प्रवेश केला. मात्र भाजपकडून अधिकृत उमेदवारी असताना विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याप्रकरणी भाजपाचे संदेश पारकर, अतुल रावराणे, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल आणि वैभववाडीचे सभापती लक्ष्मण रावराणे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पुढील सहा वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले.

काल (ता. १५) मुख्यमंत्री कणकवली मतदार संघाच्या दौऱ्यावर संपर्क मंत्री रवींद्र चव्हाण, कोकण संघटनमंत्री सतिष धोंड यांनी कणकवलीत येऊन या चौघांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार पुढील सहा वर्षासाठी भाजपमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी या चौघांनाही जिल्ह्याचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चर्चा करण्यासाठी कणकवलीत बोलावले होते. यात संदेश पारकर वगळता कोणीच हजार राहिले नाहीत.

दरम्यान, चव्हाण यांनी पारकर यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. त्यामुळे भाजपने या चौघांची पक्षातून हकालपट्टी केली. या दोघांकडे यापूर्वीदेखील कुठलीही पदे नव्हती. हे दोघेही बिन पदाचे फुल अधिकारी होते. मात्र ते आता त्यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जठार यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :