राज्यातील दोन कोटी मुस्लिमांपैकी भाजपने एकालाही मंत्री केले नाही – अजित पवार

अजित पवार

पुणे: महाराष्ट्रातील दोन कोटी मुस्लिमांपैकी एकालाही भाजपने मंत्री का केले नाही ? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. भाजप सरकार शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले मात्र सर्वधर्मीयांना समान वागणूक देण्याचा शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांनी घेतलेला नाही. असेही पवार म्हणाले. हल्लाबोल सभेच्या तयारीसाठी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

पुणे शहारातील पाणी, कचरा, वाहतूक कोंडी आदी प्रश्‍न प्रलंबित आहेत. केवळ आश्‍वासन देऊन भाजपचे राज्यकर्ते झोपले आहेत. नितीन गडकरी हे हजारो कोटींची घोषणा करतात. मग वाहतूक कोंडी का सुटत नाही. भाजपने एकही कारखाना आणला नाही. भाजप केवळ द्वेशाचे राजकारण करीत असल्याचा आरोप पवार यानी केला.

दरम्यान, यावेळी खासदार वंदना चव्हाण, पालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादीचे वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष नारायण गलांडे, सुनील टिंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते