भाजप हा पक्ष नरेंद्र मोदी व अमित शाह यांचा नाही, भविष्यातही नसेल

amit shah and pm narendra modi

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय जनता पार्टी हा पक्ष कोणत्याही एका व्यक्तीचा नाही. तो विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

भाजप हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पक्ष आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याविषयी बोलताना गडकरी यांनी ‘भाजप सारखा राष्ट्रीय पक्ष कधीच व्यक्ती केंद्रीत होऊ शकत नाही. भाजपने आतापर्यंत घराणेशाहीला स्थान दिलेले नाही आणि यापुढेही भाजपत घराणेशाहीला स्थान मिळणार नाही त्यामुळे भाजप हा पक्ष कधीच अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेद्र मोदी किंवा अमित शाह यांचा नव्हता आणि यापुढेही नसेल’ असं मत व्यक्त केले आहे.

Loading...

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही असा अंदाज तज्ज्ञ व्यक्ती व्यक्त करत आहेत. मात्र हा अंदाज खोटा आहे, गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा भाजपला जास्त मत मिळतील” असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही