#Article370 : ‘भाजपाने राज्यघटनेची हत्या केली’

blank

टीम महाराष्ट्र देशा : गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. हा प्रस्ताव सभागृहात मांडताच विरोधकांनी मोठा गदारोळ घातला. जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात आले असून जम्मू-काश्मीरसह लडाखलाही केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होणार आहेत.

यावरून काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी “आमचा भारतीय राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे. राज्यघटनेची सुरक्षा करण्यासाठी आम्ही जिवाची बाजी लावू. पण आज भाजपाने राज्यघटनेची हत्या केली असं विधान केले आहे.

तसेच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून ‘आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे अस त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या निर्णयावरून हे कलम हटवणे हे अनैतिक आणि असंवैधानिक आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. ‘सरकारच्या या पोलादी निर्णयाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न पूर्ण झालं’ असल्याच उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी आज खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मोठी बातमी : ३७० कलम हटणार, तर जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनणार

काश्मीरला आज वाजपेयींची उणीव जाणवते : मेहबुबा मुफ्ती

मोदी सरकारचा धमाका ; जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव