भाजपने दिली आशिष शेलारांकडे आणखी एक नवी जबाबदारी

shelar aashish

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय जनता पार्टीचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर पक्षाकडून त्यांच्यावर अजून एक महत्त्वाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना अद्याप अडीच वर्षांचा कालावधी आहे. या काळात पक्षाची संघटना अधिक मजबूत करून येत्या निवडणुकीत महापालिकेत सत्ता आणण्याची तयारी पक्षाने सुरू केली असून त्याची मुख्य जबाबदारी शेलार यांच्यावर राहणार आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षात पक्षाने विनोद तावडे यांच्याकडून मुंबईची जबाबदारी हळूहळू शेलार यांच्याकडे सोपविली आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत शेलारांनी शिवसेनेला कायमच टार्गेट केले आहे. या पार्श्वभूमीवर आता आता नव्याने त्यांच्यावर मुंबईची विशेष जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Loading...

त्याचप्रमाणे, राज्यातील सत्ता गमावल्यानंतरही विधी मंडळ कामकाजात शेलार यांच्याकडे मुख्य प्रतोदच्या निमित्ताने महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षातील तरुण तडफदार फडणवीस, शेलार, ठाकूर यांच्यासारख्या नेतृत्त्वाकडे पक्षाची संपूर्ण धुरा सोपवताना दिसत आहे. दरम्यान, सत्तेतील पाच वर्षांच्या शेवटच्या टप्प्यात शेलार यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले होते. पक्षाचा मुंबईतील प्रमुख चेहरा ही त्यांची ओळख आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार