भाजपा प्रचाराची धुरा महिलांच्या हाती

नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युती चे चित्र आता अस्पष्ट असल्याचे लक्षात घेऊन भाजपाने पर्यायी रणनीती आखत महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक व आंध्रप्रदेशात प्रत्येक घरी तीनदा भेटीची योजना आखली आहे. महिला मोर्चाकडे ही जबाबदारी सोपविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान वॉर्ड स्तरावर ज्या घरांना भेटी दिल्या आहेत त्याची यादी तयार करण्यास सांगितले आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले की, ५० दिवसांत २९ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेशांचा दौरा करून, अहवाल सोपवावा. येत्या निवडणुकीत भाजपा ला महिला मोर्चाच्या प्रयत्नातून मिळणारी मते दिसायला हवीत. त्यासाठी महिला मोर्चाने प्रत्येक घरात तीनदा भेट द्यावी. महिलांना भेटून त्यांच्या समस्या लक्षात घेऊन एका कुटुंबातून ४ ते ५ मते मिळू शकतील, अशी येत्या निवडणुकीची तयारी भाजपने सुरु केलीय.

‘त्या’ महिला पायलटने स्वतःचे प्राण देऊन वाचवले अनेकांचे जीव

पश्चिम बंगाल पोटनिवडणूकीत तृणमूल काँग्रेसची बाजी

You might also like
Comments
Loading...