सरकार घोषणाबाजीत हिरो आणि कामात मात्र झिरो – चव्हाण

BJP should apologize says Ashok Chavan

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रातलं आणि राज्यातलं भाजप सरकार घोषणाबाजीत हिरो आणि कामात मात्र झिरो असल्याची टीका घणाघाती टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. अमरावतीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

मंत्रालयातील उंदरांना मारण्यासाठी सरकार करोडो रूपये खर्च करतेय पण यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी पैसा नाही अशी टीकाही अशोक चव्हाण यांनी सरकारवर केलीये. तर या जनविरोधी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करा असं आवाहन चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.