भाजप सरकार देणार फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार ?

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकार अनेक नवनवीन निर्णय घेत आहे. नुकताच सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर आता सरकार स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची शक्यता आहे. येत्या २६ जानेवारीला यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारकडून याअगोदरच थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.त्यावरूनच केंद्र सरकार आता महात्मा फुलेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा विचार करत आहे.गेल्या
पाच राज्यातील दारूण पराभवानंतर भाजप सरकारने आता लोकप्रिय निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे, त्यामुळे फुलेंना लवकरच भारतरत्न पुरस्कार देण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...