सरकारमधील मंत्री आणि त्यांचा पक्षच बोगस आणि हे शेतकऱ्याला बोगस म्हणतात – अजित पवार

शेतकऱ्याला बोगस म्हणणारे सरकारमधील मंत्री आणि त्यांचा पक्षच बोगस आहे. कर्ज घेण्यास शेतकरी अपात्र असू शकतो, पण सात बारा असणारा शेतकरी बोगस कसा असू शकतो, असा सवाल  अजित पवार यांनी  उपस्थित केला. सरकारने मस्तीत वागू नये. जनता ही मस्ती उतरवू शकते.

यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवार पर्यंत राजकारणाची संस्कृती जोपासली. आजचे सत्ताधारी मात्र हा इतिहास कलंकित करत आहेत, असे भाजप सरकार ज्या वेगाने सत्तेत आले आहे त्याच वेगाने कोसळेल, असे वक्तव्य राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले.

सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, राज्यातही सरकारची शेतकऱ्यांबाबतची धोरणे चुकत आहेत. सरकारची धोरणे ही केवळ उद्योगपतींचे भले करणारी आहेत. राज्यकर्त्यांची अशी मग्रुरी राज्याच्या इतिहासात कधी दिसली नाही. अजित पवार यांनी म्हटले.

याशिवाय, त्यांनी सरकारच्या दडपशाहीवरही टीका केली. सध्या देशात सरकार पुरस्कृत दहशतवाद जोरात आहे. सरकार त्यांच्याविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. हे भाजप सरकारची अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे लक्षण आहे. त्यामुळे भाजप सरकार ज्या वेगानं सत्तेत आले आहे, त्याच वेगाने कोसळेल, असे अजित पवार यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...