भाजपचे सरकार आणखीन दोन वर्षे काढेल; शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा: ‘सामनामधून आपण रोज नवनवीन वाचतो. मात्र शिवसेनेची भूमिका मला समजलेली नाही. त्यामुळे भाजप सरकार अजून दोन वर्ष आरामात काढेल’ असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तसेच शिवसेनेन सरकारचा पाठींबा काढला तर राष्ट्रवादी पाठींबा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केल.

मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीवरून राजकीय तर्कवितर्क काढले जात होते. मात्र ही भेट केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयी असल्याच त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने जीएसटीमध्ये केलेले बदल हे गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

 

You might also like
Comments
Loading...