भाजप सरकारकडून संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न : पवार

blank

कोलकाता : भाजप सरकाने संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर केला आहे. ते कोलकाता येथे विरोधकांच्या महासभेत बोलत होते.

यावेळी शरद पावर म्हणाले, ‘गेल्या साडेचार वर्षात मोदी सरकारमुळे बेरोजगारी वाढली आहे. देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या महाआघाडीने कोलकात्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने संयुक्त भारत मेळाव्याचं आयोजन केले होते. या मेळाव्याला देशभरातील वीस प्रमुख पक्षाचे नेते उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,अरविंद केजरीवाल, द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, एच. डी. कुमारस्वामी, ओमर अब्दुल्ला, अखिलेश यादव, गेगांग अपांग यांच्यासह दिग्गज नेते सहभागी झालेत. ब्रिगेड ग्राऊंडमध्ये सुरू असलेल्या या जनसभेत ममता बॅनर्जी यांच्या व्यतिरिक्त विरोधी पक्षांचे 20 नेते सहभागी होते.