हे सरकार निर्लज्ज! गिरीश बापट तर काहीही बरळतात- अजित पवार

ajit pawar and girish bapat

पुणे: अजितदादा पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हे सरकार निर्लज्ज आहे. करोडो रुपये राफेल विमान खरेदी प्रकरणात यांनी खाल्ले. जातीय दंगलींवर पंतप्रधान काही बोलत नाही. या सर्व गोष्टींना उत्तर आपण दिले पाहिजे. सर्वात जास्त खासदार व आमदार या भागातून तुम्ही निवडून द्या. असे आवाहनही त्यांनी जनतेला केले. ते शिरूर येथे हल्लाबोल यात्रेदरम्यान बोलत होते.

Loading...

अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचावर देखील टीका केली. या भागात विमानतळ बनवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत, पण हे सरकार हवे तसे सहकार्य करत नाही. पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे काहीच करत नाही. गिरीश बापट तर काहीही बरळतात. शेतकरी उद्ध्वस्त होत चालला आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. सरकार काहीच हालचाल करत नाही. प्रत्येक खात्याच्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, काल मावळमध्ये बोलतांना गिरीश बापट म्हणाले, एक सडका आंबा सगळे आंबे सडवतो. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील सडके आंबे भाजपमध्ये आणून, आपले आंबे सडवू नका, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांचं स्वागत करतो. अजून कोणी राहिलं असेल, तर त्यांनाही घेऊन या. फक्त राष्ट्रवादीचं कोणी आणू नका. तसंही राष्ट्रवादीत कोणी राहिलं नाही, पळापळ झालीय. पण शिवसेनेतून आपल्या पक्षात येऊ द्या. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे, आपल्याला काही अडचण नाही. आशी खोचक टीका बापट यांनी राष्ट्रवादीवर केली.Loading…


Loading…

Loading...