fbpx

भाजप सरकार म्हणजे इंग्रजांच्या काळातील ईस्ट इंडिया कंपनी : उदयनराजे

सातारा – भाजप सरकार हे इंग्रजांच्या काळातील ईस्ट इंडिया कंपनीसारखे असल्याची टीका साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. उदयनराजे हे आज राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उदयनराजे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. सोळाव्या शतकातील ईस्ट इंडिया कंपनीचे उदाहरण देत भाजपवर उदयनराजे यांची टीका. हम कारे सो कायदा अशी सध्याच्या सरकारची परस्थिती असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना उदयनराजे म्हटले की, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण ज्या लोकांना बहुमत दिले. देशाच्या सर्वोच्च सभागृहात निवडून दिले.त्यांनी चांगला अभिनय करत तळा गळातील लोकांबद्दल बोललेले. मन की बात मधून तळागळातील लोकांचे जीवनमान उंचाऊ अशी आश्वासने दिली . परंतु जनतेने त्यांना बहुमत दिले की, तळा गळातील लोकांना यांनी गालात घालण्याचे काम केले असल्याची टीका साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.