भाजप सरकार पाकिस्तानला शिव्या घालते, मग त्यांचा कांदा कसा चालतो ? – छगन भुजबळ

भिंवडी : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी रोज रडत आहे, भाव नसल्यामुळे कांदा रस्त्यावर फेकतोय आणि सरकार पाकिस्तानमधून कांदा आणत आहे. ऐनवेळी सरकार पाकिस्तानला शिव्या घालते मग यांना पाकिस्तानचा कांदा कसा गोड लागतो ? , असा सवाल करत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपाविरोधात सुरु केलेली निर्धार परिवर्तन यात्रा आज भिवंडी येथे पोहचली.त्यावेळी उपस्थित जनसमुदायाला ते संबोधित करताना बोलत होते.

bagdure

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी रोज रडतोय, कांदा बेरोजगारांना रोजगार तर मिळाला नाही, मात्र ज्यांच्याकडे रोजगार होता त्यांचाही रोजगार सरकारने हिरावून घेतला आहे. दोन कोटी रोजगार देऊ, अशी भाषा करणाऱ्या भाजप सरकारने दीड कोटी लोकांचे रोजगार गिळले असे म्हणत भाजपवर छगन भूजबळांनी जोरदार टीका केली.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निर्धार परिवर्तन यात्रा सुरु केल्यानंतर आता भिवंडी येथे ही यात्रा पोहचली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार पांडुरंग बरोरा, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,भिवंडी जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे आदींसह भिवंडी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...