काँग्रेसच्या स्थापनेत एनी बेझंट याचं मोलाचं योगदान; पवारांनी साधला गोपाळ शेट्टींवर निशाणा

मुंबई : भाजपा खासदार गोपाळ शेट्टी हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिंदू आणि मुस्लिमांचं सारखंच योगदान होतं. मात्र, ख्रिश्चन हे भारतीय नसून ,मूळचे ब्रिटिश आहेत. त्यामुळे त्यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान नव्हतं असं वादग्रस्त वक्तव्य शेट्टी यांनी केलं होतं. यावरून त्यांच्यावर टीका होतं आहे.

दरम्यान आता या वादात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील उडी घेतलीये. गोपाळ शेट्टी यांच्या या वक्तव्यावर टीका करताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला . ख्रिश्चनांचं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत कोणतंही योगदान नव्हतं, असं वक्तव्य भाजपच्या खासदाराने केलं. त्यांना हे माहित असावं, की काँग्रेसची स्थापना देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाली होती आणि या स्थापनेमध्ये एनी बेझंट यांची महत्त्वाची भूमिका होती. अशा शब्दात त्यांनी टीका केलीये.

दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्तीमुळे शेट्टी यांनी आपला राजीनाम्याच्या निर्णय मागे घेतला आहे. मात्र आपण काही चुकीचं बोललो नसल्याने माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असं गोपाळ शेट्टीं यांनी म्हंटले आहे.

Rohan Deshmukh

अन्यथा शेतकरी भाजपला सत्तेतून पायउतार करतील- खासदार राजू शेट्टी

पुण्यनगरीत आज विठूनामाचा जयघोष ; माऊलींची पालखी भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरात मुक्कामी

Latur Advt
You might also like
Comments
Loading...