fbpx

‘वाणी’ स्वातंत्र्याची गळचेपी करणारं पद नको; भाजपा खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देणार ?

मुंबई :  भाजपा खासदार गोपाळ शेट्टी हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. भारतीय  स्वातंत्र्य लढ्यात हिंदू आणि मुस्लिमांचं सारखंच योगदान होतं. मात्र, ख्रिश्चन हे भारतीय नसून ,मूळचे ब्रिटिश आहेत. त्यामुळे त्यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान नव्हतं असं वादग्रस्त वक्तव्य शेट्टी यांनी केलं होतं. यावरून त्यांच्यावर टीका होतं आहे.

दरम्यान विधानसभा आणि लोकसभा निवडणूक जवळ येत असून ,शेट्टी यांच्या या वक्तव्यामुळे ख्रिश्चन मतदार हा भाजपपासून दुरवण्याची शक्यता लक्षात घेऊन, त्यांना पक्षनेतृत्वाने समज दिल्याने ते भाजपवर चांगलेच नाराज झाले आहेत.

ज्या पदावर ‘वाणी’ स्वात्रंत अबाधित राहात नाही, असं पद आपल्याला नकोय असं त्यांनी म्हंटलं आहे. आपल्याला पदापेक्षा आपलं स्वात्रंत महत्वाचं असल्याने आपण राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. आज एक वाजता आपला आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले.

राहुल गांधींना ‘पप्पू’ म्हणणे कॉंग्रेस नेत्याला पडले महागात; पक्षातून हकालपट्टी