अखरे गोपाळ शेट्टींचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे; माफी मागण्यास दिला नकार

मुंबई : भाजपा खासदार गोपाळ शेट्टी हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिंदू आणि मुस्लिमांचं सारखंच योगदान होतं. मात्र, ख्रिश्चन हे भारतीय नसून ,मूळचे ब्रिटिश आहेत. त्यामुळे त्यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान नव्हतं असं वादग्रस्त वक्तव्य शेट्टी यांनी केलं होतं. यावरून त्यांच्यावर टीका होतं आहे.

दरम्यान यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हंटल होत की, ज्या पदावर ‘वाणी’ स्वात्रंत अबाधित राहात नाही, असं पद आपल्याला नकोय. आपण राजीनामा देणार आहोत. शेट्टी यांच्या या वक्तव्यावर पक्ष नेतृवाने देखील त्यांना समज दिल्याने ते पक्षावर नाराज होते. त्यांनी काल राजीनामा देण्याचे संकेत दिले होते.

मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्तीमुळे शेट्टी यांनी आपला राजीनाम्याच्या निर्णय मागे घेतला आहे. मात्र आपण काही चुकीचं बोललो नसल्याने माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असं गोपाळ शेट्टीं यांनी म्हंटले आहे.

अजून एका भाजपच्या वाचाळ आमदाराचे वादग्रस्त विधान

सायबी टोपी घाला, हॅट घाला अथवा काहीही घाला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा- राजू शेट्टी