भाजप समर्थकांनी दिले राज ठाकरेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर

मुंबई : आज ‘मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ’ या मथळ्याखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यंगचित्र साकारून चांगलीच खिल्ली उडवली. राज यांच्या या व्यंगचित्राला भाजपा समर्थकांकडून त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

राज यांनी साकारलेल्या व्यंगचित्रातच काही बदल करत मनसेवर टिका केली आहे. भाजपाने साकारलेल्या व्यंगचित्राला ‘राज ठाकरेंचा कार्यकर्ता दुष्काळ’ असे शीर्षक असून मनसेची अवस्था दिशाहीन झाल्याचे टिकास्त्र सोडण्यात आले आहे. ‘मला एकहाती सत्ता द्या’ असे राज म्हणत असून त्यांच्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दाखवले आहेत.

काही लोक फक्त बोलघेवड्या सारख बोलतात, अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाना

दरम्यान, हे व्यंगचित्र सोशल मिडीयावर व्हायरल होत असतानाच नगर महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती आणि मनसेच्या विद्यमान नगरसेविका सुवर्णा जाधव व त्यांचे पती दत्ता जाधव यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.जाधव दांपत्याचा शिवसेनेत प्रवेश हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.त्यामुळे आगामी काळात तरी राज ठाकरे पक्षातील नेते आणि पदाधिकारी यांच्यावर लक्ष देतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांची व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी ‘अशी’ उडविली खिल्ली