भाजपकडून आमदार फोडण्यासाठी २ कोटी रुपयांची ऑफर

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशात भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच आमदारांना फोडण्यासाठी त्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये व पेट्रोलपंप देण्याची लालूच भाजपकडून दाखविली जात आहे असंही बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना बॅनर्जी यांनी यंदाची लोकसभा निवडणूक भाजपने लबाडीने जिंकली आहे. त्यासाठी या पक्षाने ईव्हीएम, सीआरपीए, निवडणूक आयोगाचा वापर केला अस विधान केले आहे. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आता आमदारांना फोडण्यासाठी त्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये व पेट्रोलपंप देण्याची लालूच भाजपकडून दाखविली जात आहे असंही आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

दरम्यान, कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीला भाजपच जबाबदार असल्याचही त्या म्हणाल्या. तसेच कॉंग्रेसकडूनही भाजपने पैशाच्या जोरावर आमदार फोडल्याचा आरोप भाजपवर केला आहे.