भाजपने लिहून घेतले आपल्याच ११२ नगरसेवकांचे राजीनामे !

BJP-flag

नागपूर : नागपूर महानगर पालिका निवडणुकीला १ वर्ष पूर्ण झालं आहे. या निवडणुकीत भाजपला मोठ यश मिळालं होत. पण आता ज्या नगरसेवकांच्या यशावर भाजप खुश होत त्याच नगरसेवकांवर भाजपला विश्वास नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि याच कारण म्हणजे भाजपने आपल्या ११२ नगरसेवकांचे राजीनामे लिहून घेतले आहेत.

पक्षशिस्त टिकावी आणि पक्षाला नुकसान होईल असं कृत्य कुठल्या नगरसेवकानं केल्यास त्याच्यावर कारवाई करता यावी या उद्देशानं नागपुर महापालिकेतील भाजपच्या सर्व 112 नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आले आहे असं भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी स्पष्ट केलं आहे.

नगरसेवकांचे राजिनामे घेण्याची नागपुरात भाजपची ३० वर्षांची परंपरा असल्याचंही यावेळी भाजपकडून सांगण्यात आलंय. भाजपची पक्षशिस्त टिकवण्यासाठी नगरसेवक निवडूण आल्यानंतर त्यांचे एकत्र राजिनामे घेतले जातात, यावेळेस काही कारनास्तव विलंब झाला असल्याच भाजपने स्पष्ट केलंय.

नगरसेवकांचे राजिनामे घेतल्यानंतर सुरक्षित सत्तापक्ष नेत्याकडे ठेवण्यात येतात. यामुळे पार्टीची विचारधारा तोडली किंवा पार्टीविरोधी कार्य केल्यास, त्या नगरसेवकावर कारवाई करणं सोपं जात असल्याचं भाजप नेते सांगतात.

आता संघाचे मुख्यालय आणि नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राउंड असलेल्या नागपूर मध्येच अशा प्रकारे आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांचे राजीनामे लिहून घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.