फक्त ४ नाही तब्बल ५० आमदार भाजपच्या संपर्कात : महाजन

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी- कॉंग्रेसचे 50 पेक्षा जास्त आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असे गिरीश महाजन यावेळी म्हणाले. वैभव पिचड, कालीदास कोळंबकर आणि शिवेंद्रराजे भोसलेंनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

आज हे तिन्ही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पिचड आणि कोळंबकरांनी आपला राजीनामा दिला. तर साताऱ्याचे एनसीपी आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे.काल विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला. पश्चिम महाराष्ट्रात यामुळं एनसीपीला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

शिवेंद्रराजे, संग्राम जगताप पक्ष सोडणार नाहीत : शरद पवार

राष्ट्रवादीला अजून एक धक्का; ‘हा’ माजी खासदारही भाजपच्या वाटेवर?