fbpx

शिवाजी पार्कवर या आम्ही किती काम केलं हे दाखवतो ; गडकरींच राज ठाकरेंना आव्हान

Raj-Thackeray-gadkari

टीम महाराष्ट्र देशा : गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सडकून टीका केली होती. आज भाजपाच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

नितीन गडकरी हे साबणाच्या फुग्याप्रमाणे घोषणा करत असल्याची खरमरीत टीका राज ठाकरेंनी केली होती त्याला उत्तर देत जे ५० वर्षांत नाही केलं ते पाच वर्षात करुन दाखवलं. शिवाजी पार्कवर या आम्ही किती काम केलं हे दाखवतो असे नतीन गडकरी यांनी राज ठाकरेंना आव्हान केलं आहे.

भाजपाच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात भाजपानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे.