भाजपने माझ्यावर लक्ष केंद्रितकरून उत्तरप्रदेशात निवडणूक लढवल्या

आझम खान यांची एका पाठोपाठ एक बेताल वक्तव्य

वेबटीम / लखनऊ, दि २९: आपल्या बेताल वक्तव्यांनी कायम चर्चेत असणारे समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधाने केल्याचा एक व्हिडीओ समोर आल्याने त्यांच्यावर चौफर टीका सुरु आहे. आता आपण भाजपची आयटम गर्ल आहोत. भाजप नेते इतर कोणाबद्दल बोलत नाहीत. मात्र, त्यांनी सर्व लक्ष माझ्यावर केंद्रीत करुनच उत्तरप्रदेशात निवडणूक लढवल्या असे विधान आझम खान यांनी केले आहे.

‘महिला दहशतवादी लष्कर जवानांचं गुप्तांग कापून सोबत घेऊन गेले आहेत. हात किंवा मुंडक न कापता शरिरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून संपुर्ण हिंदुस्थानाला याची लाज वाटली पाहिजे. आपण जगाला काय चेहरा दाखवणार आहोत याचाही विचार केला पाहिजे” अशी गंभीर विधाने त्यांनी केली आहेत.

You might also like
Comments
Loading...