सामाजिक तेढ पसरवल्याबद्दल भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल

bjp

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात परप्रांतीय कोठून येतात, ते कोठे वास्तव करतात याची कोणतीच माहिती नसते. मात्र यासंबंधी पोलीस यंत्रणेकडे रेकॉर्ड असायला हवे अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सतत केली होती. कालांतराने तो मुद्दा बाजुला पडला. परंतू साकीनाका प्रकरणानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान यावरूनच भाजपचे अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. ‘परप्रांतियांची नोंद ठेवा’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे यांनी दिले आहेत. हा निर्णय म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. ठाकरे सरकारने परप्रांतीयासंबंधी हा निर्णय घेतला, पण बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्याबद्दल आश्चर्यकारक मौन बाळगलेय. तर महिला शोषणाचा आरोप असलेले ठाकरे सरकारचे मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री संजय राठोड, मेहबूब शेख हे परप्रांतीय आहेत? असा खोचक सवाल करणारा आरोप अतुल भातखळकर यांनी केला होता.

तर आता भातखळकर यांनी सामाजिक तेढ पसरवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत ते ट्वीट करून म्हणाले कि, ‘मंत्रिमंडळात आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे धनंजय मुंडे, आपल्या पक्षाचे नेते संजय राठोड हे परप्रांतीय आहेत का? असा माझा मुख्यमंत्र्याना सवाल आहे. सामाजिक तेढ पसरवल्याबद्दल मी आज मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

तसेच परप्रांतीयांच्या नोंदी ठेवणे हे पूर्णपणे चुकीचे असून याबाबत मी मुख्यमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांच्या दोन समाजगटांमध्ये तेढ आणि विद्वेष निर्माण करण्यावरून मी कलम १५३ अ अंतर्गत तक्रार करण्याची आवश्यकता असून येत्या काही दिवसांत आपण अशी तक्रार करणार असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या