भाजप सरकार सर्वच आघांडय़ावर अपयशी आता राष्ट्रवादी हाच पर्याय : आ. जयंतराव पाटील

jayant patil

टीम महाराष्ट्र देशा –  केंद्रातील आणि राज्यातील भाजपाचे सरकार सर्वच आघांडय़ावर अपयशी ठरले असून नोटबंदी, जीएसटी मुळे देश देशोधडीला लागण्याची वेळ आली असून शेतकरी, व्यापारी, कामगार, छोटे व्यवसायीक व औद्योगीक क्षेत्राची या शासनाच्या धोरणामुळे मोठी पिछेहाट झाली आहे, अशी टिका माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी केली.

Loading...

कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांचा व सरपंचांचा सत्कार आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते व आ. सुमनताई पाटील, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते.

खोटी आश्वासने व भुलभुलैया करीत देशात भाजपचे सरकार आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेला भुलथापा दिल्या. त्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला पण या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. कोणतेही विकासाचे काम केले नाही मात्र जाहिरातबाजी करायला सरकार पटाईत आहे अशी टिकाही आमदार जयंत पाटील यांनी केली.

नोटबंदीने देश हैराण झाला. आपल्या हक्काचे बँकेतून व एटीएम मधून पैसे काढण्यासाठी देशातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. काळा पैसा बाहेर निघाला नाही. अतिरेक्यांची रसद ही चालूच होती त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारने नोटबंदी करुन काय साध्य केले असा सवाल आ. पाटील यांनी केला. ते पुढे म्हणाले जीएसटी मुळे महागाई वाढली, बेकारीही वाढली, व्यापारी कामगार, छोटे व्यवसायीक व शेतकरी जीएसटी आणि नोटबंदीमुळे भरडला गेला.

महाराष्ट्रातील भाजप युती शासनाने शेतकऱयांच्या कर्जमाफी बाबत चाल ढकल केली, कर्जमाफी केली असा हे सरकार डांगोरा पिटत आहे मात्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱयांच्या नाकीनऊ येत आहे. शेतकऱयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय नेहमी कर्जाची परतफेड करणाऱया शेतकऱयांना अनुदान म्हणून आम्ही 25 हजार रुपयांची सरकारकडे मागणी केली होती. मात्र हे शासन अशा शेतकऱयांना दमडीही द्यायला तयार नाही असा आरोपही जयंतराव पाटील यांनी केला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने खोटी आश्वासने देऊन जनतेला फसवले आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारला ना शेतकऱयांचे दुखणे माहित आहे ना सामान्यांचे प्रश्न माहित आहेत केवळ जनतेची फसवणूक करणे हा एकमेव उद्योग भाजपाचा असून या सरकार विरोधात आता जनतेने रस्त्यावर उतरावे तसेच महाराष्ट्राला आता राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही त्यामुळे पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन ही जयंतराव पाटील यांनी केले.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...