तान्हाजी-भाजप नेत्यांच्या व्हिडीओवर भाजपचे स्पष्टीकरण

टीम महाराष्ट्र देशा : आगामी दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपने यावर प्रत्युत्तर देत या पोस्टचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचे म्हटलं आहे. पॉलिटिकल कीडा या कुठल्याशा ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट झालेल्या व्हीडिओचा भाजपशी कुठलाही संबंध नाही, असे भाजपने स्पष्टीकरण दिले आहे.

Loading...

तसेच तो भाजपाचा अधिकृत व्हिडीओ नाही. तो कुठेही प्रचारात वापरलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कुणाचीही तुलना करण्याचे भाजप कधीही समर्थन करणार नाही, असं भाजपनं म्हटलं आहे. भाजपने ट्विट करुन हे स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, या व्हिडीओत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उदयभान राठोड दाखवण्यात आले आहे. याच प्रमाणे नरेंद्र मोदी व अमित शहा हे कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे या व्हिडीओत दाखविण्यात आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'