भाजपचे कार्यकारी अध्यक्ष मुंबई दौऱ्यावर,मातोश्रीवर जाणं टाळलं

मुंबई : मुंबईत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बैठकांचं आयोजन केलंय. यासाठीच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा हे पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मात्र या दौऱ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे कोणतेही नियोजन केलं नसल्याची माहिती समोर येत आहे.

नड्डा चैत्यभूमी, सावरकर स्मारक, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक या ठिकाणी भेट देतील आणि त्यानंतर गोरेगावमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली. गोरेगावमध्ये रविवारी होणाऱ्या मेळाव्याला नड्डा हजेरी लावणार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर महाजनादेश यात्रा काढणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला फायदा होईल अशी माहिती देखील पाटील यांनी दिली.