शिवसेनेला श्रेय मिळू नये म्हणून भाजपाची संभाजीनगरला आडकाठी

मुख्यमंत्र्यासोबत १७ तारखेला बैठक

औरंगाबाद : अटल बिहारी वाजपेयीजींच सरकार होतं तेव्हा औरंगाबादला संभाजीनगर नाव फायनल झालं होतं. हरिभाऊ बागडे आणि मी त्याबद्दलचा ठराव मांडला होता. त्याला मान्यता देण्यात आली. मात्र राज्यात सरकार नसल्यामुळे अंमलबजावणी झाली नाही. आता दोन्हीकडे सरकार आहे. त्यामुळे निराशा व्हायला नको. अशी भूमिका औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी मांडली.

ते समोर म्हणाले, मुख्यमंत्र्यासोबत १७ तारखेला बैठक आहे. त्या बैठकीसाठी दहा मुद्दे तयार केले आहेत. त्यामध्ये संभाजीनगर, समांतर, भूमीगतचा समावेश आहे. मात्र नामांतराचा प्रस्ताव अगोदर पाठवल्याची चर्चा आहे. त्याबद्दल ऍडिशनल सेक्रेटरी यांच्या सोबत चर्चा केली असून तसा प्रस्ताव आला नसल्याचं सांगितलं. हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मुद्दा होता आणि शिवसेनेला कमी महत्व मिळावं असा चर्चेमागे डाव असू शकतो. तसेच शिवजयंती तिथी प्रमाणे साजरी करायला हवी. राज्यसरकारने त्याबाबत भूमिका घ्यावी यासाठी शिवसेना मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. शिवाजी महाराजाचा जन्म झाला त्यावेळी इंग्रज भारतात नव्हते. त्यामुळे इंग्रजी तारखा देखील नव्हत्या. म्हणूनच महाराजांची जयंती ही मराठी तिथी प्रमाणे साजरी व्हायला हवी. अशी शिवसेनेची भूमिका आहे.

You might also like
Comments
Loading...