भाजपला हिंदूचा अर्थच माहित नाही – राहुल गांधी

rahul gandhi

टीम महाराष्ट्र देशा : मी मंदिर आणि मठांमध्ये गेल्याने माझ्यावर टीका झाली. खरे तर भाजपला हिंदू या शब्दाचा अर्थच कळत नाही. त्यामुळेच ते माझ्या मंदिरात जाण्यावर आक्षेप घेत असल्याची टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. बंगळुरू येथे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी भाजपवर शरसंधान साधलं आहे.

राफेलची डील चांगली आहे. हे आम्हीही जाणून आहोत. पण केवळ मोदींच्या मित्रांसाठीच ही डील चांगली आहे, अस म्हणत राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी कोणत्याही अजेंड्याविना चीनला गेले. चीनमध्ये गेल्यावर त्यांनी डोकलामबाबत ते एक शब्दही बोलले नाहीत, असं देखील