भाजपला मुलं होत नाहीत आणि दुसऱ्याची झालेली पाहवत नाहीत- गुलाबराव पाटील

gulabaro_patil

पालघर: शिवेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राजेंद्र गावित यांच्यावर टीकास्त्र सोडले. “राजेंद्र गावित हे मूळ कॉंग्रेसची औलाद आहे. आणि मुख्यमंत्री साहेब तुम्ही त्यांना मांडीवर बसवले, तुमचा धंदाच तो आहे” अशी सडकून टीका गुलाबराव पाटील यांनी केली. पालघर पोटनिवडणूक प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते.

Loading...

ते पुढे म्हणाले “आम्ही कुपोषित बालके गुबगुबीत तयार करतो. आणि ते गुबगुबीत झाले कि तुम्ही म्हणता ये सोन्या ये मांडीवर ये…आणि मांडीवर बसवता. तुम्हाला तुमची मुल होत नाहीत आणि दुसऱ्याची झालेली पाहवत नाहीत असा तुमचा धंदा आहे” असे ते म्हणाले.

भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभेची जागा रिक्त झाली होती दरम्यान चिंतामण वनगा यांच्या मुलाने श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेकडून पालघर मतदार संघातून जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने, भाजपने कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. त्यामुळे हि लढाई रंगतदार होणार आहे.

शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये नाराजीचे वातावरण असून, शिवसेनेने असं करायला नको होतं. त्या जागेवर भाजपने विजय मिळवला होता. अशा शब्दात मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.Loading…


Loading…

Loading...