fbpx

‘शेतकऱ्यांविषयी भाजपाला कसलीही आपुलकी नाही’

टीम महारष्ट्र देशा – देशातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी देशाच्या संसदेवर मोर्चा काढला. 1 किमी लांबीवर मोर्चा आला तरीदेखील भाजपचा एकही नेता किंवा खासदार त्यांना भेटायला, त्यांना सहानुभूती द्यायला संसदेबाहेर आला नाही. शेतकऱ्यांविषयी कष्टकऱ्यांविषयी भाजपाला कसलीही आपुलकी नाही हे जनतेस पूर्णपणे लक्षात आले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे.

दौंड तालूक्याती यवत येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्त यात्रेत ते बोलत होते.
यावेळी पाटील म्हणले की, भाजपाने कितीही गाजरं दाखवली तरी आपल्या कर्मांची फळं येत्या निवडणुकीत भोगावी लागणर आहेत.

शेतकऱ्यांना पाचशे रुपये देण्याचा निर्णय सरकारने आज घेतला आहे. हा निर्णय डिसेंबर २o१८ पासून लागू होईल, म्हणजे मार्च महिन्यात २ हजार रूपये हे शेतकऱ्यांना पाठवणार. पुढे आचारसंहिता लागू होईल. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवला आहे, असेही यावेळी पाटील म्हणले.