fbpx

‘भाजप’ युतीधर्माचे पालन करत नाही; मित्रपक्षांची वाढती नाराजी

shiv sena bjp

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली असून भाजप पक्ष चांगलाच अडचणीत येण्याची लक्षणे दिसत आहेत. भाजपच मित्रपक्षांसोबत वाढत चाललेलं वैर याला जबाबदार ठरू शकत. शिवसेनेनं आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता आंध्रातही तेलुगू देसमनं भाजपाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. ‘भाजप युतीधर्माचे पालन करीत नाही, उलट मित्रपक्षांची खच्ची करण्यातच त्यांना आनंद मिळतो’, असे तेलुगू देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू यांनी स्पष्ट केले आहे. याचाच दाखल देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला टोला हाणला आहे.

मित्रपक्षांची भाजपवर असलेली नाराजी वाढतच आहे. तसेच पक्षातील अंतर्गत वादामुळे भाजपची गळचेपी होऊ शकते. भाजपने जरी भाजपने निवडणुकांची तयारी सुरु केली असेल. मात्र पक्षासमोर एक धोक्याची घंटा वाजली आहे. भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात ‘एनडीए’तील अनेक मित्र पक्ष नाराज आहे. त्यामुळे भाजप पक्ष अडचणीत सापडला आहे.

शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला खांद्यावर घेऊन फिरवले व त्याच खांद्यावर बसून शिवसेनेच्याच कानात घाण करण्याचा प्रयत्न भाजपने केला. आता आंध्रच्या चंद्राबाबूंनीही तोच अनुभव कथन केला. अत्यंत संकटकाळातही ‘रालोआ’ टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेने शर्थ केली, पण आता भाजपने ३८० ते ४०० खासदारांचे ‘टार्गेट’ स्वबळावर ठेवल्याने त्यांना शुभेच्छा देण्याशिवाय आमच्या हाती दुसरे काय आहे?”, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.