‘शिवाजी महाराज बनण्याचं कोणी प्रयत्न करणं आणि घडवणं दोन्हीही भाजपला मान्य नाही’

shelar aashish

टीम महाराष्ट्र देशा – ‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे आदरानेच घेतलं गेलं पाहिजे ही उदयनराजे भोसले यांची भूमिका स्वयंस्पष्ट आहे आणि भाजपचा त्याला पाठींबाच असून छत्रपती शिवाजी महाराज बनण्याचं कोणी प्रयत्न करणं आणि घडवणं दोन्ही गोष्टी भाजपला मान्य नाही’ असं स्पष्टीकरण भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं .

तसेच भाजपने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली असून उदयनराजे भोसले यांची भूमिका स्वयंस्पष्ट आहे. भाजपलाही ती मान्य आहे असं शेलार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा प्रश्न पडतो असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं. पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटलं. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना ज्यावेळी काढली त्यावेळी वंशजांना विचारायला आला होता का .? महाशिव आघाडी मधून शिव का काढलं? ही आघाडी काढताना आम्हाला विचारायला आला होता का ? शिव वडा काढून महाराजांचे नाव दिले . शिवसेनेच्या नावावर आम्ही कधीही हरकत घेतली नाही. अस म्हणत बिनपट्ट्याच्या लोकांना लायकी दाखवून देणार अशी नाव न घेतला शिवसेना खासदार संजय राउत यांच्यावर देखील उदयनराजेंनी जोरदार घणाघात केला आहे.

तर दुसरीकडे उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर देखील जोरदार घणाघात केला आहे. आज कोणालाही जाणता राजा उपाधी दिली जाते, कोणाला दिली गेली मला माहित माहित नाही. पण जाणता राजा फक्त एकच छ.शिवाजी महाराज. अस म्हणत उदयनराजे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर कोणालाही जाणते राजे म्हणून घेण्याचा अधिकार नाही, आणि जे त्यांना जाणते राजे म्हणत असतील ते शिवाजी महाराजच अपमान करत असल्याचे देखील उदयनराजे म्हणाले.