मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते घरूनच काम पाहत आहेत तसेच हिवाळी अधिवेशनाला देखील ठाकरे उपस्थित नव्हते त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. या सर्व गोष्टींमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापत आहे. मात्र अशातच माजी मुख्यमंत्री व भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वयक्तिक पातळीवर जाऊन देखील भाजप नेत्यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं तरी त्या उत्तम पद्धतीने राज्य चलवतील, अशी टीका विरोधकांनी केली होती. या सगळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला. मात्र उद्धाव ठाकरेंनी फोन उचलला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी तो फोन उचलला.
उद्धव ठाकरे यांच्या मानेचं नुकतच ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे ते सध्या बाहेर कुठे येत नाहीयेत. याच कारणामुळे ते हिवाळी अधिवेशनाला देखील उपस्थित राहू शकले नाहीत. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता तेव्हा उद्धव ठाकरे आराम करत होते आणि म्हणून त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी तो फोन उचलला. तेव्हा फडणवीस म्हणाले, या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- यश-नुसरत जहाँ यांचं नातं तुटण्यापूर्वीच दोघांचा खरा प्रवास झाला सुरू!
- पंजाबने भाजपच्या अहंकाराला आरसा दाखवला; काँग्रेसचे भाजपला प्रत्युत्तर
- मनसेच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे पहिले आंदोलन; मात्र माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे गायब?
- सिद्धार्थच्या निधनानंतर पहिल्यांदाच शहनाज म्हणाली, “त्याचे रूप बदलले आहे, मात्र…”
- मुंबईकरांना करात माफी; मग औरंगाबादकरांवर अन्याय का? मनसेचे घंटानाद आंदोलन..!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<