भाजपकडून उदगीर मतदारसंघासाठी २९ जणांनी मागितली उमेदवारी

devendra-fadanvis

उदगीर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी लातूर येथे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात सर्वाधिक उदगीर राखीव मतदारसंघासाठी एकूण 29 उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे. मतदारसंघ राखीव असूनही उमेदवारी मिळवण्यासाठी सहापैकी सर्वात जास्त मागणी ही उदगीर मतदारसंघात नोंदवली गेल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून उदगीर मतदारसंघावर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व आहे. भाजपाचे विद्यमान आमदार सुधाकर भालेराव हे दहा वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यावेळी त्यांना पक्षांतर्गत रोषाला सामोरे जावे लागत असल्याने आणि पक्षातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांच्या उमेदवारीला विरोध केल्याने उमेदवार बदलणार असल्याच्या शक्यतेमुळे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

Loading...

शुक्रवारी लातूरच्या शासकीय विश्रामगृहावर भाजपचे बीड लातूर जिल्हा निरीक्षक तथा राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी उदगीर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार सुधाकर भालेराव, अश्वजित गायकवाड, डॉ. अनिल कांबळे, प्रा. पंडित सूर्यवंशी, संजय बोलकर, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती बालाजी दोरवे, माजी आमदार राम गुंडीले, नामदेवराव कदम, बालाजी गवारे, नरेश सोनवणे, पप्पू गायकवाड, दिग्विजय काथवटे, शिवाजी लकवाले, गणेश गायकवाड, लक्ष्मण अदावळे, दयानंद कांबळे, बालाजी गवारे, मोहन माने, केशव कांबळे यांच्यासह 29 जणांनी उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षनिरीक्षकांकडे अर्ज दाखल केला आहे.

लातूर जिल्ह्यातील लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, औसा, निलंगा व उदगीर या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वात जास्त उमेदवारीची मागणी ही उदगीर राखीव मतदारसंघासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, उदगीर मतदारसंघाला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
तानाजी चित्रपटातील 'तो' आक्षेपार्ह भाग वगळावा; नाभिक समाजाची मागणी
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले