सातारा पालिका बरखास्त करून तेथे प्रशासक नेमण्याची भाजपची मागणी

satara-

सातारा : भवानी पेठेतील युनियन क्लबची जागा बेकायदेशीरपणे बळकविण्यात आली आहे. क्लबच्या पिछाडीला असणा-या 46 गुंठे जागा हरित उपक्रमाअंर्तगत बागेसाठी आरक्षित असताना तिथे राजकीय आकसातून चौपाटी पुनर्वसनाचे षडयंत्र रचले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणारे तत्कालीन पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांनी केली आहे. यावेळी भाजपचे गटनेते धनंजय जांभळे नगरसेविका प्राची शहाणे, विजय काटवटे, प्रशांत खामकर मिलिंद काकडे उपस्थित होते.

भाजप नगरसेवकांच्या कार्यकालाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित सिद्धी पवार यांनी गटनेत्यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, सातारा पालिकेतील सातारा विकास आघाडीच्या सत्ताधा-यांना भाजपच्या सहा नगरसेवकांनी गेल्या वर्षभरात आठ प्रकल्पांचे प्रस्ताव दिले. राज्यातील भाजप सरकारने सातारा पालिकेला तब्बल 150 कोटी रुपये दिले. मात्र केवळ राजकीय श्रेयवादाच्या आकसातून सातारा विकास आघाडीने कोणताच प्रकल्प धडपणे होऊ दिला नाही. त्यामुळे सातारा पालिका बरखास्त करून तेथे प्रशासक नेमावा अशी मागणी सिध्दी पवार यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे.