fbpx

पोटनिवडणुकीत झालेला दारूण पराभव भाजपच्या जिव्हारी; आज बैठकांवर बैठका

bjp-flag-representational-image

मुंबई: देशात १४ ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत दारूण पराभवानंतर भाजपच्या बैठकीवर बैठकी सुरु आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी आला आहे. शिवसेनेने स्वबळावर लढण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार केल्यानंतर, भाजपनेही आता एकला चलो रे! भूमिका घेतली आहे.

राज्यात आज पक्षाच्या वतीने अनेक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली बैठक आज सकाळी ११ वाजता दादरमधील वसंत स्मृती भाजप कार्यालयात होणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि सर्व जिल्हाध्यक्षांची आज मुंबईत बैठक होणार आहे. तसेच रात्री मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर भाजप मंत्र्यांची बैठक होईल.

१४ जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूत लोकसभेच्या ४ जागा तर विधानसभेसाठी १० जागा होत्या. विजयाची घौडदौड सुरु ठेवणाऱ्या भाजपला या निवडणुकीत चांगलाच झटका बसला. भाजपला फक्त २ जागांवर विजय मिळवता आला आहे. भाजपला पालघर लोकसभा मतदारसंघ व उत्तराखंडमधील थराली लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. तर बाकी सर्व जागांवर काँग्रेस व स्थानिक पक्षांचे उमेदवार विजयी झाले.

1 Comment

Click here to post a comment